‘या’ कारणासाठी नितीन देसाईंनी संपवले जीवन ? धक्कादायक माहिती येतेय समोर

Nitin Desai Suicide : सिने जगतामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे.

दरम्यान, देसाई यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे. यातूनच कर्जबाजारीपणाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. लोकसत्ताच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांनी काही कारणास्तव सीएफएम (CFM) या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा दोन वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या.

काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली. त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते. अशी माहिती आता समोर येत आहे.