सुषमा अंधारेला हिंदू धर्माचा मुळव्याध झाला; संगीता वानखेडे यांनी अंधारेंना झापलं 

नमाज हिची तोंडपाठ आहे , हिला ख्रिश्चन धर्माचे काही घेणेदेणे नाही मग हिला हिंदू धर्माचं  काय चावलं का ? - वानखेडे

 पुणे- प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांचा सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे उठली की सुटली काहीतरी भुंकती, आणि आपले लोकं टाळ्या वाजवतात. अरे लाजा विकल्या का कुठं असा त्यांनी सवाल केला आहे.  नमाज हिची तोंडपाठ आहे . हिला ख्रिश्चन धर्माचे काही घेणेदेणे नाही मग हिला हिंदू धर्माचं  काय चावलं का ?  सुषमा अंधारे यांना हिंदू धर्माचा मुळव्याध झाला असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

लहान मुलीला घरी सोडून दुबईला जाणारी ही कसली गरिबांची माय ? महाराष्ट्राच्या भूमीत तुझा जन्म झाला याचा जरा अभिमान वाटू दे. उद्धव ठाकरे यांचे कां बहिरे झाले का जरा लाज वाटू द्या असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुन्हा जर आमच्या हिंदू देवीदेवतांच्या बाबत काही बोललीस तर संगीता वानखेडे काय आहे हे दाखवून देईल असा इशारा देखील त्यांनी शेवटी दिला आहे.

पहा संपूर्ण व्हिडीओ