खोट्या बातम्यांमुळे वाढली शिवसेनेची डोकेदुखी, आदित्य ठाकरेंवर आली सारवासारव करण्याची वेळ

मुंबई – मुंबईत सध्या सर्वच पक्षांकडून आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यातूनच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दुसऱ्या बाजूला खोट्या बातम्यांमुळे शिवसेनेची चांगलीच डोकेदुखील वाढल्याचे चित्र आहे.

आगामी काळात मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या काही नगरसेवकांऐवजी 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेत तरुण रक्ताला वाव देण्याबाबत विचार सुरु असल्याचा चर्चा सुरु होत्या. विविध माध्यमांनी यासंदर्भात बातम्या दिल्या होत्या.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा फेटाळल्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांविषयी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले 2-3 दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.