Govt Scheme : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान नेमके काय आहे ? 

योजनेचा उद्देश
■राज्यातील इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

योजनेच्या प्रमुख अटी
■१५ ते ४५ या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य धारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे संबंधीत प्रशिक्षण पुरविणाऱ्या सूचीबद्ध असलेल्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते.
■ प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी एमएसएसडीएसच्या संकेतस्थळावर सूचीबद्ध करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांची यादी उपलब्ध आहे. तसेच आवश्यक असलेल्या अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती उपलब्ध आहे.

लाभाचे स्वरूप
■प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणावर होणाऱ्या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.

अर्ज करण्याची पद्धत
■महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावरून, उमेदवाराला पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या यादीमधून, संबंधीत संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे .
■महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे सूचीबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे अर्ज केल्यावर त्या संस्थेकडून प्रशिक्षण सुरू करण्यात येणाऱ्या पुढील तुकडीत समावेश करण्यात येईल.
■ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mssds.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क
कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे