Kane Williamson | बिना लग्नाचा तिसऱ्यांदा बाप झाला हा क्रिकेटर, केन विलियम्सनने तिसऱ्या बाळाचे केले स्वागत

न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर केन विलियम्सन (Kane Williamson) तिसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी साराने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला. विलियम्सनने पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याला आधीच दोन मुले आहेत. मॅगी नावाची तीन वर्षांची मुलगी आणि जवळपास एक वर्षांचा मुलगा. अशा स्थितीत केन विलियम्सनने तिसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. तिसऱ्यांदा बाप झाल्याबद्दल चाहते सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत.

केन विलियम्सन (Kane Williamson) आणि त्याची पत्नी सारा तिसऱ्यांदा पालक बनले आहेत
वास्तविक, न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विलियम्सन आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या तिसऱ्या मुलाचे स्वागत केले. केन विलियम्सनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना सांगितले की त्याच्या घरी एक छोटी परी जन्माला आली आहे. आता ते तिघे भावंडे झाले आहेत. या सुंदर मुलीचे जगात स्वागत आहे. तुझे सुरक्षित आगमन आणि पुढील रोमांचक प्रवासाबद्दल खूप आभारी आहे.

दरम्यान केन विलियम्सन जरी तीन मुलांचा पिता बनला असला तरीही तो आणि सारा यांचे लग्न झालेले नाही. परंतु त्यांच्यामध्ये जवळपास 9 वर्षांपासूनचे नाते आहे. या दोघांना आत्तापर्यंत तीन मुले झाली असली तरीही केन आणि साराचे अधिकृतपणे लग्न झालेले नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी