ही काय धर्मशाळा आहे का ? कोणीही कसेही वागायला?; विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात पुन्हा संतापले

मुंबई – सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व सह्या मारून घेण्याचे काम सुरु होते. काही काळ असाच प्रकार सुरु राहताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा चांगलाच चढला, त्यांनी थेट आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणी ही कसेही वागायला? असा संतापही व्यक्त केला.

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांचे रौद्ररूप पाहताच सर्व सत्ताधारी सदस्य आपापल्या जागेवर जाऊन बसले. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भोवती जमून सत्ताधारी सदस्यांनी गराडा करुन आपल्या अर्जांवर शेरे व सह्या करून घेण्याला सुरुवात केली. हा प्रकार काही काळ असाच सुरु राहताच विरोधी पक्षनेते चांगलेच संतापले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे रुद्रारुप बघून पुन्हा सभागृह सुरळीत सुरू झाले.