भारतीय किसान युनियनची मोठी घोषणा, उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘या’ पक्षांना दिला पाठींबा

लखनौ – राकेश टिकैत यांची संघटना भारतीय किसान युनियन (BKU) ने उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी-राष्ट्रीय लोक दल (RLD) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. बीकेयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राकेश टिकैत यांचे मोठे बंधू नरेश टिकैत यांनी सिसौली येथे जनतेला संबोधित करताना सांगितले की, या आघाडीच्या उमेदवारांना राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळेल, अशी आशा आहे.

त्याचवेळी प्रयागराज येथे पोहोचलेल्या राकेश टिकैत यांनी समर्थनासाठी आपले पत्ते उघडले नसून ते भाजपचा पराभव करणार असल्याचे बोलले. ते म्हणाले की, 13 महिन्यांच्या आंदोलनानंतर शेतकरी स्वत:च शहाणे झाले आहेत. मी स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचे शेतकरी नेते म्हणाले. तसेच ते  कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यासपीठ शेअर करणार नाही.

राकेश टिकैत म्हणाले,  शेतकरी त्याच्या भविष्याचा निर्णय स्वतः घेण्याच्या स्थितीत आहे. यापुढे जाती-धर्माच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. एमएसपीसह सर्व मुद्द्यांवर आता शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. किसान युनियन 31 जानेवारीला देशभरात आंदोलन करणार आहे.उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपची सपा आघाडी, बसपा आणि काँग्रेसशी स्पर्धा आहे.