अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्न कधी करणार? सुनील शेट्टी म्हणाला…

मुंबई – सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी केएल राहुलसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. अनेकवेळा हे सेलिब्रिटी कपल एकत्र स्पॉट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की हे दोघे येत्या काही महिन्यात लग्न करू शकतात. मात्र ही केवळ अफवा असल्याचे अथियाने स्पष्ट केले होते.

आता अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी हे कपल कधी लग्न करणार आहे हे सांगितले आहे. सुनील म्हणाला, ‘आशिया कप, विश्वचषक, दक्षिण आफ्रिका दौरा, ऑस्ट्रेलिया दौरा यामुळे राहुलचे वेळापत्रक व्यस्त आहे. मुलांना ब्रेक मिळाल्यावर हे लग्न होईल. हे एका दिवसात होऊ शकत नाही.’