Manoj Jarange यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, आमचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर

Prakash Ambedkar Offer To Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मात्र तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. सगे सोयरेची मागणी मान्य झाली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. असे असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

आम्ही मनोज जरांगेंना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वत:च्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. म्हणून मनोज जरांगेंनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्र्यपणे लढवली पाहिजे. मनोज जरांगेंनी जालना लोकसभेतून उमेदवारी जाहीर करावी, ते नक्की निवडूण येतील अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवता येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!