आलिया का झाली ट्रोल? आलियाच्या लुकपेक्षा ब्लाऊजची चर्चा जास्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिची बेस्ट फ्रेंड अनुष्का रंजन कपूर आणि आदित्य सीलच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये या स्टाईलमध्ये पोहोचली. चित्रपट अभिनेत्रीने या लग्नात पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात हॉट ब्लाउज परिधान करून सर्व लाइमलाइट चोरले. मात्र, यानंतर अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले.

अभिनेत्री आलिया भट्टने लेमन हिरव्या-गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि बोल्ड लिपस्टिक शेड वापरली होती. तिने फॅन्सी ब्लाउजसह वेस्टर्न लूक घेतला होता. अनुष्का रंजन आणि आदित्य सीलच्या लग्नात, अभिनेत्री आलिया भट्ट हॉट ब्लाउजमध्ये पोज देताना दिसली, आलिया भट्टच्या ब्लाउजवर तिच्या चाहत्यांकडून असंख्य प्रश्न उपस्थित झाले. काही नेटकरांनी तो ब्लाउज ती कशी घालते हे देखील विचारले आहे.

आलिया भट्टच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही इंटरनेट युजर्सनी सोशल मीडियावर कमेंट करत आलिया भट्टने काय परिधान केले आहे, असे लिहिले. काही इंटरनेट वापरकर्त्यांनी आलिया भट्टच्या ब्लाउजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अभिनेत्रीने उलटा ब्लाउज घातल्याचेही सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ट्रोल्सकडे लक्ष दिले नाही. तर तिने आपल्या बेस्ट फ्रेंडचे फंक्शन्सचा मंत्रमुग्ध आनंद लुटत या रिस्की ब्लाउजमध्ये पोज देताना दिसली. अनुष्का रंजन आणि आदित्य सीलच्या लग्नात आलिया भट्टची ही स्टाईल लोकांना आवडली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आलियाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.