अनेक कुटुंबे पुन्हा चुलीकडे वळली, गॅस  दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या – सुळे 

Mumbai –  आजपासून घरगुती गॅस सिलिंडर महाग (Cylinder expensive) झाले आहेत. घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी झाली आहे.

यापूर्वी जूनमध्ये बातमी आली होती की आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणेही महाग झाले आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नवीन कनेक्शनच्या (New connection)  किमतीत प्रचंड वाढ केली होती. त्यानंतर नवीन ग्राहकांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी 2200 रुपये खर्च केल्याची चर्चा समोर आली. यापूर्वी ही किंमत 1450 रुपये होती.

दरम्यान, सर्वसामान्यांच्या खिशावर सरकारने हा दरोडा टाकल्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, स्वयंपाकाचा गॅस (Cooking gas) पुन्हा एकदा वाढला असून यावेळी ही दरवाढ ५० रुपयांची आहे. म्हणजे आता मुंबईत हे सिलिंडर घेण्यासाठी १ हजार ५२ रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रासलेली असताना त्यांना काहीतरी दिलासा मिळणे अपेक्षित होते. परंतु उलट गॅस दरवाढ(Gas price hike) झाल्यामुळे त्यांच्या त्रासात वाढ झाली.अनेक कुटुंबे पुन्हा चुलीकडे वळली आहेत.केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) आपणास नम्र विनंती आहे की, कृपया जनतेवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेता ही दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.