Chandigarh University Girls MMS : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक

Punjab University Girls MMS : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानेही घेतली आहे.(chandigarh university students hostel private video leaked)

व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.(Chandigarh University MMS)