मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : Raj Thackeray

Raj Thackeray On Manaoj Jarange : मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण (Maratha Reservation) कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) म्हणाले.

मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली. ते म्हणाले, या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्यामुळे मुळ मुद्दे भरकटले जात आहेत. इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत, परंतु, तुम्हाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे. ज्या गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत ते विषय जनतेच्या डोक्यात येता कामा नये, असा प्रयत्न होतोय. लोकांचं लक्ष वेगळ्या गोष्टींकडे वळवलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…