2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर? पवारांच्या वक्तव्याने भूकंप 

Sharad Pawar : आगामी निवडणुका एकजुटीने निवडणूक लढवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अक्षरशः तोंडावर पाडले आहे.  महाविकास आघाडीबद्दल शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही? हे आता कसं सांगणार, असं शरद पवार म्हणालेत.

आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा पुरेशी नसते, त्यामध्ये जागांचे वाटप अजून काहीचं केलं नाही. त्यामुळं त्याबाबत कसं सांगता येईल असे शरद पवार म्हणाले. तसेच वंचित आघाडीसोबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. काल (23 एप्रिल) शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केलं. जागावाटपाची चर्चा झाली नाही. त्यामुळं त्याबाबत आत्ताच कसं बोलणार असे पवार म्हणालेत. दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.