सुशीलकुमार शिंदे असणार राष्ट्रपतीपदासाठी कॉंग्रेसचे उमेदवार ?

सोलापूर – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आज दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे.त्यामुळे,रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत रवाना झाले आहेत.

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. 2002 मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे,त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांची उमेदवारी दिली होती.आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आकड्याचं गणित पाहाता सत्ताधारी एनडीएकडे आघाडी आहे. त्यात जर बीजद, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कषगम (अन्नाद्रमुक) आणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (वाईएसआरसीपी) यासारख्या पक्षाचं समर्थन मिळाल तर एनडीएच्या उमेदरावाचा विजय निश्चित मानला जातोय.