गंगाखेड : ममता प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

गंगाखेड / विनायक आंधळे :- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) या संकल्पनेवर देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1949 रोजी देश ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रध्वज (National Flag) लाल किल्ल्यापासून ते देशातील सरकारी कार्यालयापर्यंत फडकावला जातो.

गंगाखेड (Gangakhed) शहरातील ममता प्राथमिक विद्यालयाचा (Mamta Primary School) स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, अशा क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर व थोर समाजसेवकांच्या वेषभूषा साकारल्या. तसेच यावेळी डान्स स्पर्धा व तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी, शाळेच्या मुख्य इमारतीत संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट जी. यु. अळनुरे साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव एम.के. चोरघडे, प्राचार्य जी. एम. चोरघडे, मुख्याध्यापक व्ही. जी. राठोड तसेच विद्यार्थी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.