पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान नेमके काय आहे?

उद्दिष्ट: जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा व स्त्री रुग्णालय स्तरावर स्त्रीरोग तज्ञ तसेच रेडियोलॉजिस्ट यांच्यामार्फत गरोदर मातांची तपासणी करणे. अतिजोखमीच्या गरोदर माता यांचे वेळेत निदान करणे. त्यांची रक्तक्षय(anemia), उच्च रक्तदाब(High blood pressure), मधूमेह (honeydew), इतर संक्रमण आदी आजारांवर वेळेत योग्य उपचार करणे. मातामृत्यू व नवजात बाल मृत्यूदर कमी करणे.

लाभाचे स्वरुप (Nature of benefit)
• प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला सर्व गर्भवती महिलांची जवळपासच्या सरकारी आरोग्य सुविधांमधील तज्ज्ञ, वैद्यकांकडून प्रसूतीपूर्व मोफत तपासणी केली जाते.
• गर्भवती महिलेची रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तशर्करा आदी तपासण्यांसह अल्ट्रासाऊंड सेवा आदी सेवाही मोफत दिल्या जातात.
• गर्भवती महिलांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात.
• कोणतीही गुंतागुंत आढळल्यास, महिलांना योग्य औषधे आणि सल्ला दिला जातो किंवा योग्य स्तरावरील सुविधांसाठी संदर्भित केले जाते. गुंतागुंत, उच्च जोखीम घटक असलेल्या गर्भवती महिलांना विशेष काळजी प्रदान करण्यासाठी त्यांच्या ‘मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड’वर लाल स्टिकर लावण्यात येते.

संपर्क:(Contact)
• जवळची एएनएम, आशा कार्यकर्ती
• पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत सेवा पुरविणाऱ्या सुविधांच्या यादीसाठी टोल फ्री क्रमांक- १८०० १८० ११०४