Amitabh Bachchan यांना अजिबात आवडत नाही घरातील महिलांचं ‘हे’ काम; लेकीनेच केला खुलासा

चित्रपटांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. दिग्गज कलाकार मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत सर्वत्र आपली उपस्थिती दर्शवतात. आता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) हिने आपल्या वडिलांबद्दल एक अतिशय मनोरंजक खुलासा केला आहे, जो जाणून घेतल्यानंतर बिग बींचे चाहते आश्चर्यचकित होऊ शकतात. श्वेताने हा खुलासा मुलगी नव्या नवेली नंदाच्या व्हॉट द हेल नव्या सीझन 2 या पॉडकास्टमध्ये केला आहे.

अलीकडेच श्वेता बच्चन तिच्या मुलीच्या पॉडकास्टवर दिसली. येथे तिने एक गोष्ट उघड केली जी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना अजिबात आवडत नाही. तिने उघड केले की जेव्हा कुटुंबातील स्त्रिया केस कापतात, तेव्हा त्याचा अमिताभ यांना तिरस्कार वाटतो. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, श्वेताने खुलासा केला आहे की, मोठी झाल्यावर तिने अनेकदा केस कापले आणि त्यांची लांबी कमी ठेवली, ही सवय वडील अमिताभ यांना आवडत नव्हती. नव्यानेही चॅट दरम्यान तिच्या आईच्या वक्तव्याची पुष्टी केली. नानांना लहान केस अजिबात आवडत नाहीत, असे ती म्हणाली.

आई श्वेताच्या या खुलाश्याला नव्याने पुष्टी दिली आणि म्हणाली, ‘त्यांना याचा तिरस्कार वाटतो, मी केस कापले तरी ते नेहमी म्हणतात, ‘तू असं का केलंस?’ ते त्याचा तिरस्कार करतात. त्यांना लांब केस आवडतात. आपल्यापैकी कोणीही केस कापतो तेव्हा त्याेना ते आवडत नाही. श्वेताने हे देखील सांगितले की आई जया यांनी केस चांगले ठेवण्यासाठी तिला कशी मदत केली. केसांची काळजी घेण्यामध्ये कांद्याचा रस लावण्याचाही समावेश असल्याचे तिने उघड केले. याशिवाय पॉडकास्टमध्ये त्यांनी इतर अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?