तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, तुम्ही भारतमातेचे मारेकरी आहात; राहुल गांधीचा भाजपवर आरोप

Rahul Gandhi : बुधवारी (9 ऑगस्ट, 2023) केंद्र सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी पहिले भाषण केले.

ते म्हणाले, मणिपूरच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारत मातेची हत्या केली, तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. त्यामुळे तुमचे पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही. तुम्ही भारतमातेचे मारेकरी आहात.

ते म्हणाले की, भारतीय लष्कराची इच्छा असेल तर ते एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात. सरकारला मणिपूरमध्ये शांतता नको आहे. पंतप्रधान मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत.

Bharat Jodo यात्रेदरम्यान ‘विम्याचे पैसे मिळाले का, असे विचारले असता शेतकऱ्याने हात धरून ते मिळाले नाही, असे सांगितले. भारतातील बड्या उद्योगपतींनी ते माझ्याकडून हिसकावून घेतले. यावेळी एक अतिशय विचित्र गोष्ट घडली. जेव्हा मी त्या शेतकऱ्याला पाहिले आणि तो माझ्याशी बोलत होता, तेव्हा त्याच्या हृदयातील वेदना माझ्या मनात आली. असंते म्हणाले.