Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना BCCI सचिव जय शाहने दिले ICC विश्वचषकाचे गोल्डन तिकीट

ICC World Cup Golden Ticket: वर्ल्ड कप 2023 पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 12 वर्षांनंतर भारत पुन्हा एकदा 50 षटकांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवताना दिसणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान संघात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. 

मात्र या सामन्यासाठी तिकीटांची किंमत गगनाला भिडली आहे. कारण विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट 57 लाखांमध्ये उपलब्ध आहे. असे असले तरीही बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना ‘ICC ODI World Cup 2023’ चे गोल्डन तिकीट दिले आहे. या तिकिटासह त्यांना सर्व सामने लक्झरी तसेच व्हीआयपी स्टँडमधून फ्रीमध्ये पाहता येणार आहे. अमिताभ आणि क्रिकेट याचा फार जुना संबंध आहे. अमिताभ यांना क्रिकेट खेळायला आवडते. ते बऱ्याचदा क्रिकेट संबधित पोस्ट शेयर करत असतात.

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जय शाह यांनी अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट देतांनाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले आहे की, “Golden ticket for our golden icons! BCCI सचिव जय शाह यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना हे गोल्डन तिकीट देण्याचा बहुमान मिळाला.

एक महान अभिनेता आणि एक क्रिकेट प्रेमी अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियासाठी दिलेला पाठिंबा आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी त्यांना बोर्डात ठेवल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.” तर बीसीसीआयचे हे पुन्हा रिट्विट करत अमिताभ यांनी जय शाह यांचे आभार मानले आहेत.