Bachchu Kadu | “बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणांची भाषा बदलली   

Bachchu Kadu | भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.आता नवनीत राणा या आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार रवी राणा म्हणाले, अमरावती लोकसभेबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध नाही. प्रसारमाध्यमं कसल्या बातम्या दाखवत आहेत त्याची मला माहिती नाही. सर्वजण आमच्याबरोबरच आहेत. आम्ही एनडीएतील सर्व पक्ष जोमाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत.

मी एनडीएमधील घटक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो, मी बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीसमोर हात जोडून विनंती करतो की, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत. त्यासाठीच तुम्ही नवनीत राणा यांना आशीर्वाद द्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?