जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्याला १० लाख देणार, भाजपा नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई – “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

या वक्तव्यावरुन भाजपा नेते जितेंद्र आव्हाडांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. अशातच एका भाजपा नेत्याने जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्यास १० लाखांचं बक्षीस देणार, अशी घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर (Kapil Dahekar) यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल जळगाव, जालन्यामध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला १० लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.