शिंदे गटातील नाराज दहा आमदार आणि इतर पाच असे एकूण 15 आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – पवार

Rohit Pawar On Shinde Group: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भविष्यवाणी करणाऱ्या नेत्याचे पेव फुटले असून यात आता युवा आमदार रोहित पवार देखील सामील झाले आहेत. स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची चिंता करण्याऐवजी रोहित पवारांना सवयीप्रमाणे इतर पक्षात काय होणार यातच जास्त रस असल्याचे दिसून येत आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना मोठं वक्तव्य केले आहे. शिंदे गटात मोठी नाराजी असून, शिंदे गटातील नाराज दहा आमदार आणि इतर पाच असे एकूण 15 आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटातील काही आमदार नाराज आहे. तर, शिंदे गटाचे 10 आणि इतर 5 असे एकूण 15 आमदार नाराज आहेत. तर नाराज असलेले हे सर्व आमदार ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.