आदित्य ठाकरे यांचे खंडोबा दर्शन; पुरंदर शिवसेनेला येणार सोन्याचे दिवस?

जेजुरी : राज्याचे माजी पर्यटनमंत्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेतले. माजी आमदार विजय शिवतारे हे शिंदे गटासोबत गेल्याने पुरंदर शिवसेनेला (Purandar Shivsena) खिंडार पडले आहे. अशातच पुरंदर तालुक्यात शिवसेना नव्याने उभी करू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

आपण खंडोबाच्या दर्शनासाठी आणि आशिर्वादासाठी आलो आहे.असं म्हणत त्यांनी माध्यमांना राजकीय विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मंदिराच्या आवारात राजकारणावर बोलायला नको असे ते म्हणाले. परंतु पुरंदर तालुक्यात आदित्य ठाकरे यांनी भेट दिल्याने स्थानिक शिवसैनिकांना बळ मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.