श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ( Shrikant Deshmukh ) यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा ( Sexual exploitation and fraud ) आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील ( MP Sanjay Patil ) यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

श्रीकांत देशमुख आणि पीडित यांची पुर्वीपासून ओळख होती. मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना त्यांचीआणि पीडित महिलेची ओखळ वाढत गेली. श्रीकांत यांनी पीडित महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. तुळजापुरच्या मंदिरात लग्न करणार असं सांगितलं होतं. त्यानंतर पीडित महिलेला श्रीकांत यांनी फसवल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.