विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेत्यांची बैठक

Mumbai – महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, आज रविवार, दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतील विधानभवनातील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  (Ambadas Danve), ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अनिल परब (Anil Parab), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), अजय चौधरी, कपिल पाटील, सचिन आहिर, विनोद निकोले आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे नेते छत्तीसगढच्या रायपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी दूरध्वनीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा केली आणि बैठकीतील निर्णयांना पाठिंबा व्यक्त केला.