Maharashtra Budget 2023 : फडणविसांनी घोषणा केलेले ‘असे’ असतील नदीजोड प्रकल्प

मुंबई – केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. राज्य शासनाच्या खजिन्यातून नागरिकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाणार याकडे लक्ष लागले असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या आहेत.विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

असे असतील नदीजोड प्रकल्प…
– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
– मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
– वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा  
– मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
– बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी
– धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी
– गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा
– चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
– बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार
– गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार
– कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधार्‍यांच्या कामांना गती
– पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प
– केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
– कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
– या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता