“…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या माजी खासदाराचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना आणि भाजपशी हात मिळवल्यापासून राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाच्या आशेने भाजप- शिवसेना युतीसोबत सहभागी झाले आहेत, अशा चर्चा सुरू आहे. भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलताना केला आहे. चव्हाण यांच्या दाव्यानंतर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

“अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कोणापासूनही लपलेली नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीरच आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील,” असं काकडे म्हणाले आहेत