एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही – नाना पटोले

एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही - नाना पटोले

मुंबई  – भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई दौ-यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले.

भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post
crop loan

रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढवा; जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकर्स आढावा सभेत सूचना

Next Post
sprinkler

तुषार सिंचनचा ‘या’ जिल्ह्यातील 1 हजार 750 शेतक-यांना लाभ; 3 कोटींचे अनुदान वितरण

Related Posts
raj thackeray

‘या’ कारणामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त…
Read More
Sachin Waze : सचिन वाझे हा बदनाम आरोपी, राष्ट्रवादीचे महेश तपासे यांची टीका

Sachin Waze : सचिन वाझे हा बदनाम आरोपी, राष्ट्रवादीचे महेश तपासे यांची टीका

Sachin Waze : सचिन वाझे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार…
Read More
आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे नेतआहेत आपला पक्ष पुढे; शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी एकदा पहाच 

आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे नेतआहेत आपला पक्ष पुढे; शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी एकदा पहाच 

मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एका गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत तर…
Read More