शिवीगाळ प्रकरण तापले; धंगेकरांच्या विरोधात महापालिकेचा अभियंता संघ आक्रमक

Kasba MLA Ravindra Dhangekar : कॉँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap)यांना शिवीगाळ केली होती.

या घटनेचा महापालिकेच्या अभियंता संघाने निषेध केला. महापालिकेच्या हिरवळीव जमलेल्या सर्व अभियंत्यांनी घडलेला प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय असल्याची टीका यावेळी केली. महापालिकेमधील अधिकाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान राखला जायला हवा अशी अपेक्षा देखील या आंदोलनावेळी व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनाला शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर, प्रकल्प विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधीक्षक युवराज देशमुख, अभियंता सुनील कदम, संजय पोळ, केदार साठे, मुकुंद बर्वे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय – छगन भुजबळ