RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) देशातील 5 सहकारी बँकांवर नियमांविरोधात काम केल्याबद्दल आणि ग्राहकांना कर्ज देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घातली आहे. राज्यातील आदर्श महिला नागरिक सहकारी बँक औरंगाबाद आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक या दोन बँकांचा यात समावेश आहे. इतर तीन बँका उत्तर प्रदेश, कर्नाटक तसंच आंध्र प्रदेशातल्या आहेत.
शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या ग्राहकांना 5 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या बँकांना कर्ज देण्यास, गुंतवणूक करण्यास किंवा ठेवी मिळविण्यापासून रोखण्यात आलं आहे. यासोबतच या बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयने पैसे काढण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. ही बंदी सहा महिने लागू राहील.