Gangster Prasad Pujari Arrest : प्रसाद पुजारीला मुंबई पोलिसांनी चीनमध्ये ठोकल्या बेड्या

Gangster Prasad Pujari Arrest : रवी पुजारी गँगला मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) मोठा झटका दिलाय. 20 वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या प्रसाद पुजारीला मुंबई पोलिसांनी चीनमध्ये बेड्या ठोकल्यायत. हत्या आणि खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये प्रसाद पुजारी हा वॉन्टेड होता.

2020 मध्ये प्रसादवर अखेरचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पुजारीला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होता. अखेर तो एका चीनी महिलेशी लग्न करुन चीनमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला चीनमध्ये जाऊन बेड्या ठोकल्यात. तब्बल 20 वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती लागलाय. आता पोलीस त्याची चौकशी करून अजून याच्या टोळीत कोण कोण आहे याचा शोध घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार