Bhausaheb Andhalkar | कट्टर शिवसैनिक भाऊसाहेब आंधळकरांचा शिंदेना धक्का! वंचितकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

Bhausaheb Andhalkar | धाराशिव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. येथे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीतून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाऊसाहेब आंधळकर हे यापूर्वी शिवसेना शिंदे गटात कार्यरत होते. धाराशिव हा पारंपारिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे महायुतीतून शिवसैनिकाला ही जागा मिळावी असा शिवसेना शिंदे गटाचा आग्रह होता. परंतु राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील .यांना उमेदवारी कायम ठेवण्यत आली. दरम्यान, कालच भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar ) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर आज त्यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धाराशिव लोकसभेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, या मतदारसंघातून कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावे, कारण हा पारंपारिक शिवसेनेचे मतदारसंघ असल्याचे आंधळकर म्हणाले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत