शिरूरच्या खासदारकीबाबत भाष्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अजितदादा बरसले; म्हणाले….

पुणे – पुण्यातील आंबेगाव येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आयोजित केलेले क्रिकेटचे सामने (Cricket Match) पाहण्यासाठी खासदार संजय राऊत नुकतेच आंबेगावात आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने आले आहेत.

शिरूरचे (Shirur) माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत (Parliament) दिसतील. असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार (NCP MP Amol Kolhe) आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे (MVA) घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवार म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी ते वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करील, पण उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना आहे ? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.