‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचे हात खूप मोठे, इच्छा असल्यास तिथे बसून शेतकऱ्यांना मदत करू शकतात’

Jitendra Awhad: एखाद्या कोणत्याही पक्षातील विधिमंडळातील आमदारांचा गट हा त्या पार्टीचा पक्ष होऊ शकत नाही खरा पक्ष पक्षातील कार्यकर्ते आणि संघटना असते ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत आहे. आम्हाला विश्वास आहे की, पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारकडून कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याच्या विकासाकरिता बैठक घेणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येते. मात्र एकीकडे मराठवाडासह महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे सावट आहे. तसेच शेतकरी संकटना असतांना मंत्रिमंडळाच्या बैठकी करिता कोट्यवधी रुपये उडवण्यात येत आहे. मंत्र्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इंडियाच्या बैठकीसाठी खोल्या बूक केल्या तेव्हा त्यांनी किती गाजावाजा केला होता. आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप केले होते. आता त्यांना ४०० खोल्यांची गरज का पडते. असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

इंडिया आघाडीने कुठल्याही न्यूज चैनल वर बंदी आणलेली नाही आहे. त्या चैनल कडून असहकाऱ्याची भूमिका असल्यामुळे आम्हाला महात्मा गांधी यांनी शिकवले प्रमाणे आम्ही की असहकाऱ्याची भूमिका घेतली आहे. या चॅनलकडून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करण्यात येते. आम्ही वाहिनीवर कोणतीही बंदी आणली नाही. या टीव्ही चॅनल मध्ये जर 80 प्रोग्राम प्रसारित होत असेल तर त्यामध्ये 75 टक्के प्रोग्राम हे देशांमध्ये भाजप विरुद्ध आघाडी संदर्भात दोष पसरवण्यासारखे वक्तव्य करण्यात येत असते. त्यामुळे आम्ही या चॅनलवर बोलण्यापासून बंदी घातली आहे. ज्या प्रमाणांत प्रसार माध्यमांचा बोलण्याचा आणि दाखवण्याचा अधिकार आहे. त्याचंप्रमाणे आम्हाला देखील संविधानाने न बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजस्थान निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने मदत करायला पाहिजेत मात्र राज्य सरकारचे प्रमुख नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी राज्याबाहेर असले तरी त्यांचे हात खूप मोठे आहेत. ते तिथे बसून देखील मदत करू शकतात असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=-dHV1iQBLGLbEBd_

महत्त्वाच्या बातम्या-
संभाजी भिडेंच्या विरोधात कारवाई होत नसल्याने तुषार गांधी ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे होणार Mohan Bhgwat यांच्या हस्ते प्रकाशन

‘नवीन आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा’