Ajit Pawar | विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे यांच्याकडे पाहून कळतं, अजितदादांनी केलं कौतुक

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता पुणे क्लब हाऊस (Pune Club House) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सुनेत्रा पवार यांचे पती व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी विजय शिवतारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

अजित पवार म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना विजय करा, पुणे, शिरूर आणि मावळमधील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. अजून विकास करण्यासाठी आपल्याला केंद्राची मदत हवी आहे.

महायुतीला विजयी करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे यांच्याकडे पाहून कळतं असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात