Ajit Pawar सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या फलकावर शाईफेक, बारामतीत वातावरण तापले

पुणे : सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना विजयी करावं, अशा आशयाचा आणि अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेला फलक काऱ्हाटी गावात एका शेती फार्मच्या मालकानं लावला होता. त्या फलकावर शाईफेक करण्यात आलेली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत ही शाईफेक झाल्याचं सकाळी समोर आलं.

या बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा संबंधित फलकावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या फलकावर अजित पवार (Ajit Pawar) यांचा देखील फोटो वापरण्यात आला होता.

‘मटा’ने दिलेल्या वृत्तानुसार, काऱ्हाटीतील एका शेती फार्मच्या मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील अशा चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर या घडलेल्या घटनेमुळे विरोधकांचा संयम ढळू लागला असल्याची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी