Chhagan Bhujbal | वैद्यकीय महाविद्यालयासह नाशिकमधील अपूर्ण अवस्थेतील प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे

Chhagan Bhujbal : आरोग्य विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयासह गंगापूर येथे कन्व्हेशन सेंटर, साहसी क्रीडा संकुल व कलाग्राम सह नाशिक मधील अपूर्ण असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक मेळा बसस्थानक लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा.देवयानी फरांदे,आमदार सीमाताई हिरे,आ.ऍड. राहुल ढिकले,जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,विभाग नियंत्रक अरुण सिया,प्रशांत जाधव,बाळासाहेब सानप यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या बस स्थानकाचा विकास हा विमानतळाच्या धर्तीवर करण्यात आला आहे. ही वास्तू अतिशय सुंदर झाली असून नाशिकच्या या बस स्थानकाच्या धर्तीवर राज्यातील इतर बस स्थानकांचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की,नाशिकच्या विकासासाठी कृषी टर्मिनल मार्केट, किकवी पेयजल प्रकल्प,इगतपुरी हील स्टेशन,द्वारका ते नाशिकरोड चौपदरी उड्डाणपूल यासह अनेक महत्त्वाची कामे करण्यात यावी तसेच नाशिकच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा