Akola News | अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द; जाणून घ्या नेमके कारण

Akola News | अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं काल रद्द केली. भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 16 मार्चला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या पोटनिवडणुकीत (Akola News) निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळत नसल्याचा मुद्दा या याचिकेत मांडला होता. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त चार महिन्याचा कालावधी मिळणार होता. नियमानं तो कमीत कमी सहा महिने मिळायला हवा. हे मान्य करत न्यायालयानं ही पोटनिवडणूक रद्द केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार