MS Dhoni | वयाच्या 42 व्या वर्षी 24चा जोश! एमएस धोनीने बिबट्यासारखी डाईव्ह मारत पकडला झेल

वय ही फक्त एक संख्या आहे… एमएस धोनी (MS Dhoni) हे उत्तम प्रकारे सिद्ध करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) हा स्टार यष्टीरक्षक करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, पण या 42 वर्षीय खेळाडूची चपळता पाहता त्याचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. एमएस धोनीने मंगळवारी आयपीएल 2024 च्या सातव्या सामन्यात विजय शंकरचा आश्चर्यकारक झेल घेऊन चाहत्यांना वेड लावले.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एमएस धोनीने डॅरिल मिशेलच्या चेंडूवर विजय शंकरचा अप्रतिम झेल घेतला. गुजरात टायटन्सच्या डावाच्या आठव्या षटकात ही घटना घडली. डॅरिल मिशेलने षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपजवळ मारला, ज्यावर शंकर ड्राईव्ह खेळायला गेला. पण चेंडू त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन पहिल्या स्लिपच्या दिशेने गेला. एमएस धोनीने डाव्या बाजूने बिबट्यासारखे डायव्हिंग करून आश्चर्यकारक झेल घेतला.

धोनीच्या (MS Dhoni) या कॅचचा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. या कॅचनंतर स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेट चाहते धोनी… धोनीच्या घोषणा देताना दिसले. एमएस धोनीचा झेल संघसहकाऱ्यांनी उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर धोनीचे कौतुक होत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. चाहते एमएस धोनीच्या फलंदाजीची आतुरतेने वाट पाहत होते, पण माहीची फलंदाजीची पाळी आली नाही म्हणून ती प्रतिक्षा संपली नाही. मात्र या सामन्यात शानदार झेल घेत सर्वांनाच आपले फॅन बनवले. संपूर्ण सामन्यात एकच झेल घेऊन धोनी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार