LokSabha Elections 2024 | महायुतीचं 99 टक्के जागावाटप निश्चित; अजित दादांनी केली पहिल्या उमेदवाराची घोषणा

LokSabha Elections 2024 | महायुतीचं 99 टक्के जागावाटप निश्चित झालं असून गुरुवारी जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी केली. पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड आणि परभणी लोकसभा (LokSabha Elections 2024) मतदारसंघांविषयी चर्चा झाल्याची त्यांनी सांगितलं.

दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार