Love jihad : गरबा आणि दांडिया आयोजकांना आचार्य तुषार भोसले यांनी केली ‘ही’ विनंती

Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे.(Allow only Hindus to play Garba, demands Vishwa Hindu Parishad).

गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्या आणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी भाष्य केले आहे. आपल्या लेकी-बाळींच्या सुरक्षेसाठी गरबा, दांडिया आयोजकांनी प्रत्येकाचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासावे असं भोसले यांनी म्हटलं आहे.नवरात्रौत्सवात गरबा आणि दांडिया आयोजकांना आमची विनंती आहे की त्यांनी प्रत्येकाचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासावे. कारण एक मोठे षडयंत्र रचून ‘लव्ह जिहाद’ घडवले जाते. म्हणुन हिंदू समाजातल्या आपल्या लेकी-बाळींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे असं भोसले यांनी म्हटले आहे.