एसी घेताना नेहमी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; आयुष्यात कधीही पश्चाताप वाटणार नाही

पुणे – उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच पंखा आणि एसीची आठवण येते. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, योग्य एसी कसा निवडावा. साधारणपणे एसीचे मुख्य तीन प्रकार पडतात. स्प्लिट एसी ,विंडो एसी,पोर्टेबल एसी  हे एसीचे  मुख्य तीन प्रकार पडतात. या तिन्ही एसीचे स्वताचे असे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. आपण जाणून घेणार आहोत सर्व फायदे आहे तोटे.

१)  स्प्लिट एसी – भिंतीवर जो एसी लावलेला असतो त्याला स्प्लिट एसी म्हणातात.या एसीचे दोन भाग असतात एक आतील बाजूस आणि एक बाहेरील बाजूस.बाहेरील बाजूस जे मशीन बसविलेले असते त्यातून वेगवेगळे वायु बाहेर टाकले जातात.स्प्लिट एसी हा एसीमध्ये सर्वाधिक खर्चिक प्रकार मानला जातो.कारण या एसीची काळजी घेणे अवघड असते. या एसीला सर्वाधिक मेंटेन्स देखील लागतो.पण या एसीचे दोन फायदे आहेत.ते म्हणजे हा एसी सर्वाधिक वेगाने रूम थंड करतो.तसेच हा एसी कोणत्याही भिंतीवर बसविता येतो. एसी घेताना ही देखील तपासून पहा की त्यांचे लाइट बिल किती येणार आहे.कारण वर्षभरात आपण किमान ४ महीने तरी एसी वापरतो, जर अधिक वीजबिल येणारा एसी असेल तर नक्कीच तुम्हाला अधिक वीज बिल भरावे लागेल.

२ ) विंडो एसी – जर तुम्ही भाड्याच्या घरात रहात असाल तर तुमच्यासाठी विंडो एसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्प्लिट एसीला ज्या प्रमाणे दोन भाग असतात तसे विंडो एसीला नसते. विंडो एसी हे संपूर्ण एकच मशीन असते.हा एसी स्प्लिट एसी पेक्षा थोडासा स्वस्त असतो.याची जोडणी करणे देखील खूप सोप्पे आहे. यांचा मेंटेन्स ठेवणे देखील अतिशय सोप्पे आहे. कारण हा एसी आपण काढून व्यवस्थित साफ करू शकतो.

या एसीचे काही तोटे देखील आहेत. जसे की हे मशीन संपूर्ण एक असल्यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात आवाज येतो.तसेच जर तुमची रूम फार मोठी असेल तर ती संपूर्ण रूम थंड पडणार नाही. कारण या एसीची कुलिंग क्षमता कमी असते. या एसीचा सर्वाधिक तोटा म्हणजे हा एसी खिडकीत ठेवावा लागतो त्यामुळे तुमच्या खिडकीतून काही सुंदर दृश्य दिसत असतील तर ती दृश दिसणार नाहीत.तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे एसी हा टन्सवर देखील घेतला जातो. जसे की एक टन किंवा दीड टन. टन्सवर एसी असल्यावर जितका जास्त टन्स असेल तितके जास्त त्यांची कुलिंग करण्याची क्षमता असते.

३) पोर्टबल एसी – पोर्टबल एसी हा आपल्या देशात अजून तितकासा प्रचलित प्रकार नाही. आपल्याकडे पोर्टबल कूलर फार मोठ्या प्रमाणात वापरले जातात.अनेकदा एसी घेताना लोक पोर्टबल एसीला अधिक प्राधान्य देतात. त्यांना वाटते हा एसी आपण सहज कोठेही नेहू शकतो. जसे की आपण दिवसभर तो हॉलमध्ये वापरू शकतो कारण आपण हॉलमध्ये असतो. रात्रीच्या वेळेस आपण तो बेडरूममध्ये वापरू शकतो. त्यामुळे या एसीला प्रचंड मागणी असते. या एसीचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. फायदे म्हणजे हा एसी आपण सहज एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. या वजनाला देखील अधिक नसतो.परंतु यांची किंमत अधिक असते. तसेच यांचा आवाज देखील अधिक येतो. जर तुमच्या रूम्स लहान असतील तर नक्कीच हा एसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.