कॉंग्रेसला गळती झाली सुरु; चव्हाण यांच्यासह ‘हा’ मातब्बर नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan Resigned: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला (Congress) हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील (Mahavikas Aghadi) धक्का मानला जात आहे. ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असून पक्षाची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आता कॉंग्रेस समोर असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर (Amar Rajpurkar) हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ही महत्त्वाची घडामोड घडली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात खिंडार पडायला सुरुवात झाली आहे असंच यामुळे म्हणता येईल.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया