अक्षर पटेलने थाटामाटात उरकलं लग्न, जाणून घ्या नेमकी कोण आहे त्याची पत्नी मेहा पटेल?

काही दिवसांपूर्वीच यष्टीरक्षक केएल राहुल याने अभिनेत्री अथिया शेट्टी (KL Rahul Athiya Shetty Wedding) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता राहुलनंतर भारतीय गोलंदाज अक्षर पटेल (Axar Patel Wedding) लग्नबंधनात अडकला आहे. गुरुवारी (२६ जानेवारी) वडोदरा येथे धूमधडाक्यात अक्षरने त्याची लाँग टाईम प्रेयसी मेहा पटेल (Meha Patel) हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. अक्षरच्या लग्नाला गोलंदाज जयदेव उनाडकटने पत्नीसह हजेरी लावली आहे.

अक्षरने मेहासोबत लग्न करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मर्यादित षटकांच्या मालिकांमधून सुट्टी घेतली होती. अखेर गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर वरातीत अक्षर जोरदार ठुमके लगावतानाही दिसला.

अक्षर पटेल आणि मेहा पटेल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी २० जानेवारी २०२२ रोजी दोघांची एंगेजमेंट (engagement) झाली होती. आता दोघांनीही लग्न केले आहे.

दरम्यान रिपोर्ट्सनुसार, मेहा पटेल डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट (Dietician and Nutritionist)आहे. मेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय तिने अक्षर पटलेसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याही हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू आहे. अक्षर पटेलने मेहाला तिच्या 28 व्या वाढदिवसादरम्यान प्रपोज केले होते.