‘सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडातील तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे’

मुंबई – माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot) यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) आक्षेपार्ह भाषणाविषयी पत्रकारांनी सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी  शिवराळ भाषा वापरली. त्यांनी मिटकरी यांची तुलना तमाशाच्या फडावरच्या नाच्यासोबत केली.

मिटकरी यांच्यावर टीका करताना नेते सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली. अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. तर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आता या टीकेला मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे शेतकऱ्यांचे नेते (Farmers leaders) असून त्यांच्यावर टीका करण्याएवढा मोठा मी नाही. मात्र सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या (BJP) फडातील तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP)  अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोतांना लगावला आहे.

मिटकरी म्हणाले, सदाभाऊ यांची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे का ? असा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पिंजरा चित्रपटात (Pinjra Film) गुरुजींनी आधी तमाशाला विरोध केला होता आणि नंतर त्यांनाच तमाशात नाचावं लागलं, तशीच सदाभाऊंची अवस्था झालीये. आगामी काळात भाजपच्या फडात तुणतुणे घेऊन नाचणाऱ्याची सदाभाऊंची भूमिका राहील, अशी टीका करत सदाभाऊंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.