यूपी STFचा धडाका ; गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचं एन्काउंटर

झाशी – उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले. (An encounter with gangster Atiq Ahmed’s son) दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. झाशी येथे त्यांची चकमक झाली. त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफचा दावा आहे.

या एन्काऊंटर संबंधित माहिती देताना उत्तर प्रदेश पोलीस म्हणाले की, अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत (UP STF) झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.. प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघंही ठार झाले. या दोघांवरही पाच-पाच लाखांचं बक्षीस होतं.

झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांनी यावर प्रतिक्रिया देताना यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. त्याचवेळी गृह प्रधान सचिव संजय प्रसाद यांनी या चकमकीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. मात्र, या चकमकीनंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक बोलावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.