सरकारला पाझर फुटेना; आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन 

उस्मानाबाद – गेले कित्येक दिवस  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून राज्य सरकारला या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात कोणताही रस नसल्याचे चित्र आहे. यातूनच आता कर्मचारी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलू लागले आहेत. यातच आता एका एसटी कर्मचाऱ्याने शुक्रवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे.

हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांने उस्मानाबादेत आपल्या राहत्या घरी उशीरा रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतदेह बस आंदोलन स्थळी आणल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार झाले होते.

एसटीचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी ११६ दिवसापासून संप चालू आहे. या संपात हणमंत अकोसकर सहभागी होते. संपात सहभागी असल्यामुळे पगार मिळत नव्हता, आई-वडील पत्नी दोन लहाणं मुले यांची उपासमार होवू नये म्हणून हणमंत अकोसकर हे मजुरी करुन कुटुंबाचा सांभाळ करत होते. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेहापासून कर्मचारी भावूक झाले होते सरकारविरोधी संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.