अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी

Anushka Sharma: महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) जोरदार तयारी सुरु असून, गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतायेत. गणेश चतुर्थी उद्या 19 सप्टेंबरला आहे. सेलिब्रिटींनी आपल्या घरी गणपती बाप्पा आणण्यास सुरुवात केली आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) आपल्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. आपल्या तयारीचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अनुष्का शर्मा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अनुष्काने एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहलं की, “जेव्हा गणपती बाप्पासाठी तुम्हाला घरातील संपूर्ण फर्निचर शिफ्ट करायचं असतं, तेव्हा जिम ही एकमेव जागा असते. जिथे तुम्ही सगळ्या वस्तू ठेऊ शकता”.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण