लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Kokate | शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा;आठवलेंचे पुदुचेरीत आवाहन

Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, वंचित दुसरा उमेदवार देणार ?